Wednesday, May 19, 2021 | 12:59 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

लॉकडाऊनबाबत सरकारचे एकतर्फी धोरण
रायगड
08-Apr-2021 10:35 PM

रायगड

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

सक्तीचे एकतर्फी लॉकडाऊन करुन जनतेला वार्‍यावर सोडणार्‍या केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणावर टिका करीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे.

आ. जयंत पाटील यांनी एका व्हिडीओ मार्फत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शासनाच्या धोरणाचा चांगलाच समाचार घेतला. जयंत पाटील म्हणाले की, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर राज्य शासनाने कोरोनाच्या बाबतीत जे धोरण ठेवलेले आहे ते धोरण एकतर्फी आहे. या धोरणामध्ये होणारे नुकसान व्यापारी आणि प्रामुख्याने छोटया उद्योगांना जे ग्रामीण भागातील उद्योजक आहेत, त्यांचे होणार आहे. गेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये, एक वर्षामध्ये शासनाने धोरण ठरविले होते की, असलेल्या कर्जाचे पुर्नगठण करणार, कर्जाच्या व्याजाला स्थगिती देणार, हे व्याज आम्ही केंद्र सरकार भरु, मात्र त्याची कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. आज जे छोट उद्योग, दुकाने बंद केलेले आहेत, त्यांचे जे मजुर, कामगार आहेत,  त्यांच्यावर असणारे कारागीर आहेत, अकाऊंट्स आहेत त्यांची खरी अतोनात अशी हानी होत आहे. म्हणून आर्थिक नुकसान आणि उद्या चुल कशी पेटवायची असा प्रश्‍न त्यांच्यासमोर येऊन पडलेला आहे. त्याबाबतीत कुठलेही एकतर्फी धोरण राबवून दुकाने बंद करुन कोरोनाच्या निमित्ताने सर्वच छोटे व्यवसाय बंद  करण्याचे धोरण शासन  ठरवत असेल तर निषेधार्थ आहे. आज लोकांची सहनशिलता संपली आहे. त्यामुळे राज्य शासनाने आपल्या धोरणात बदल करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top