Wednesday, May 19, 2021 | 01:34 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या दणक्याने मागण्या मान्य
रायगड
30-Apr-2021 09:06 PM

रायगड

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या प्रकल्पांनी कोरोनासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी आपला सीएसआर निधी देण्याची मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली होती. तसे पत्र देखील मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच संबंधीत विभागांना आणि आससीएफ प्रशासन यांना दिले होते. आ. जयंत पाटील यांच्या या मागणीची त्वरीत दखल घेत

राष्ट्रीय केमिकल्स अँड  फर्टिलाइज़र्स लिमिटेड थळतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयाला अद्ययावत वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी निगमित सामाजिक दायित्व (CSR)च्या माध्यमातून  रु. 74.29 लाखांचा निधी रुग्ण कल्याण समितीकडे जमा केला आहे. या निधीतून अद्ययावत वैद्यकीय उपकरणांची खरेदी प्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयाने प्रारंभ केली असून लवकरच ही वैद्यकीय उपकरणे रुग्णसेवेत रुजू होतील असे आरसीएफ प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. याबाबत आरसीएफ प्रशासनाने आ. जयंत पाटील यांना पत्र देत याबाबतची माहीती दिली आहे.

रायगड जिल्ह्याच्या दूरस्थ भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने  प्राथमिक आरोग्य केंद्र, धोकवडे अंतर्गत असलेल्या नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे व आनुषंगिक रुग्ण सेवेपयोगी 15.75 लाख रु किमतीच्या  साहित्याची खरेदी आरसीएफने पूर्ण केली असून लवकरच हे साहित्य देखील  रुग्णसेवेत दाखल होईल. तसेच कॉन्ट्रास्ट इंफ्यूजन पंप, डिजिटल एक्स रे सिस्टम आणि पोर्टेबल एक्स रे मशीन ही सुमारे रु.16.29 लाख किमतीची अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आरसीएफद्वारे कंपनी स्तरावर खरेदी करून जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबागला उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

कोरोना संक्रमणाचा उद्रेक ध्यानात घेऊन रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी रु 55 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्तावही तातडीच्या मान्यतेसाठी प्रक्रियेत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिपत्याखाली समर्पित कोविड केअर सेंटर उभे करण्यासाठी आरसीएफ वसाहतीमधील शाळेची इमारत उपलब्ध करून दिली आहे. तसेच कोविड-१९ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहयोगाने आरसीएफ वसाहतीत  कोविड-१९ लसीकरण केंद्र कार्यान्वयित झाले आहे.

निगमित सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत एकंदरीत समाज उन्नयनासह समाजातील गरजूंना लाभदायी ठरतील अशा विविधांगी योजना कर्तव्यनिष्ठेने आणि प्राधान्यक्रमाने राबविण्यावर आरसीएफने नेहमीच भर दिला आहे. वित्तीय वर्ष 2020-21 दरम्यान रायगड जिल्ह्यातील विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या मदतीसाठी रु. 2.89 कोटी खर्च करण्यात आले आहेत. यात परिसरातील गावांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, थळ, नवगावसह परिसरातील ग्रामस्थांना मोफत वैद्यकीय चिकित्सा, ग्रामपंचायतींना घंटा गाड्यांचे वितरण, रस्तेबांधणी/दुरूस्ती, शेतकर्‍यांना खते, बियाणे, भातांची रोपे, फळझाडांची रोपे यांचे मोफत वाटप, शैक्षणिक संस्थांना संगणक व क्रीडासाहित्याचे वितरण या उपक्रमांचा समावेश आहे. यापुढील काळातही जबाबदार निगमित आस्थापनेच्या भूमिकेतून आरसीएफ आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यास बांधील असल्याचेही म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top