Monday, January 18, 2021 | 04:02 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

निवडणूकीत आता माऊस, पेनड्राईव्ह, बिस्किट आणि भाजीपालाही
रायगड
04-Jan-2021 09:57 PM

रायगड

40 नव्या निवडणूक चिन्हांची भर

अलिबाग  भारत रांजणकर 

जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सोमवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. या चिन्हांमध्ये निवडणूक आयोगाने 40 नव्या चिन्हांची भर घातली आहे. त्यामध्ये संगणकाचा माऊस, पेनड्राईव्ह, सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह बिस्कीट, भाजीपालांच्या चिन्हांचा समावेश असल्याने आकर्षक चिन्हावर उमेदवारांचा डोळा असतो.

जिल्ह्यात 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. 840 जागांसाठी सुमारे अडीच हजार अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक रिंगणात प्रत्यक्षात उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षाची भूमिका महत्त्वाची असली, तरी त्यांना त्यांची अधिकृत चिन्हे वापरता येत नाहीत. 

निवडणूक आयोगाने नव्याने 40 चिन्हांचा समावेश केला आहे. त्यामुळे चिन्हांची संख्या 190 वर पोहचली आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठ्या संख्येने चिन्ह देण्यात आली आहेत. त्यातील आकर्षक आणि मतदारांच्या लवकर पचनी पडतील, लक्षात राहतील अशा चिन्हांवर उमेदवारांनी आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे.

 

वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार

विविध ग्रामपंचायतीमध्ये ठराविक पॅनेल निवडणूक लढवत असल्यास त्यांना एका ग्रामपंचायतीसाठी संबंधित उमेदवाराला एखादे चिन्ह मिळाले, तर ते दुसर्‍या ग्रामपंचायतीमध्ये अन्य पॅनेलच्या उमेदवारांना मिळणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांना त्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी चिन्ह वापरावे लागणार आहे. म्हणजेच, एकाच पॅनेलमधील उमेदवारांना विविध चिन्हांवर लढावे लागणार आहे.

 

पेनड्राईव्ह, बिस्कीट, सीसटीव्ही, माऊस या नवीन चिन्हांची पडली भर

निवडणूक आयोगाने नव्याने 40 चिन्हे देऊ केली आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्हांची संख्या ही 190 वर पोचली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरा, बिस्कीट, पेनड्राईव्ह, माऊस, फलंदाज, टोस्टर, सिमला मिरची, आक्रोड, भेंडी, टोस्टर, कर्णफुले, चार्जर, बडे केक, फुगा, पांगुळगाडा, हवा भरण्याचा पंप पाळपाट लालटन, आईस्क्रीम यासह अन्य चिन्हांचा समावेश आहे.

............

अशी आहेत चिन्हे

टिव्ही, कपाट, रिक्षा, सफरचंद, एसी, टोपली, बॅट, विजेरी (टार्च), मण्यांचा हार पट्टा, दुर्बिण, फळा, होडी, पुस्तक, पेटी, पाव, ब्रश, बादली, बस, गणक यंत्र, कॅमेरा, कॅन, मेणबत्ती, खटारा, फॅन, साखळी, कोट, नागरळाची बाग, नारळ, कंगवा, क्रेन, कपबशी, हिरा, ड्रीलमशीन, डंबेल्स, विजेचे खांब, बासरी, फुटबाल, ऊस, गॅस सिंलेडर, आल, काचेचा पेला, चष्मा, द्राक्ष, हेडफोन यासह अन्य चिन्हांचा समावेश आहे.

.............

उमेदवार नवीन चिन्हांची मागणी करतात. त्यांनी मागणी केलेल्या चिन्हांची नोंद करुन निवडणूक आयोग नवीन चिन्हांची वाढ करुन देते. आता 40 नवीन चिन्हांची वाढ केली आहे. त्यामुळे तब्बल 190 निवडणूक चिन्ह झाली आहेत.

- सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी, रायगड

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top