Tuesday, January 26, 2021 | 09:34 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

अलिबाग: 38 जागांसाठी 80 जणांत लढत 58 जणांची माघार
रायगड
04-Jan-2021 10:04 PM

रायगड

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या 38 जागांसाठी घेण्यात येणार्‍या निवडणूकीत आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 58 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक रिंगणात उर्वरित 80 उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. यापैकी सासवणे ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वीच शेकापच्या उमेदवार भाग्यश्री नाखवा या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

तालुक्यातील पेझारी ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी 35 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत एकाचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यानंतर उर्वरित 34 उमेदवारांपैकी 16 जणांनी आपले अर्ज आज मागे घेतले. आता 18 उमेदवारांमध्ये खरी लढत रंगणार आहे. तर सासवणे ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज दाखल करताना 35 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात प्रभाग क्रं 1 मधील शेकापक्षाच्या उमेदवार भाग्यश्री सोमनाथ नाखवा यांच्या समोर विरोधकांना उमेदवारच न सापडल्याने या जागेवर शेकापक्षाचा बिनविरोध विजय मिळाला आहे. तर उर्वरित 8 जागांसाठी निवडणूक होणार आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत 18 जणांनी माघार घेतल्याने 17 उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. वाघोडे ग्रामपंचायतीमध्ये 9 जागांसाठी 29 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज छाननी दरम्यान बाद ठरला. उर्वरित 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता 20 जणांमध्ये लढाई होईल. तर मान तर्फे झिराड ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 41 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज 16 जणांनी माघार घेतल्याने आता 4 प्रभागात 25 उमेदवार रिंगणात आपले नशिब आजमावणार आहेत.

 

 

अर्ज मागे घेण्याची प्रक्रीया मंदावली

ऑनलाईन प्रक्रीया त्यात संथ इंटरनेटचा फटका

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकूण 88 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. यातून 840 सदस्यांची निवड केली जाणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मदत संपल्यानंतर निवडणूक आयोगाने लगेचच उमेदवारांना चिन्ह वाटप सुरू करण्याचा कार्यक्रम होता. मात्र ऑनलाईन प्रक्रियेमुळे आणि इंटरनेटच्या कासवगतीने रात्री उशिरापर्यंत किती उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तसेच किती रिंगणात उभे आहेत याबाबत काहिच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top