Wednesday, May 19, 2021 | 01:46 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पोस्कोच्या भंगारवरून सेना-राष्ट्रवादीत घमासान
रायगड
03-May-2021 12:15 AM

रायगड

रोहा । प्रतिनिधी |

शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्यावर राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याला काही दिवस होत नाहीत तोच पुन्हा एकदा रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे शिवसेनेचे महाडचे आ. भरत गोगावले यांची गाडी राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी फोडल्याने महविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षातील वाद विकोपाला गेल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या घटनेमुळे सुतारवाडी परिसरातील वातावरण तंग झाले असून याठिकाणी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.

भिरा फाटा ते सुतारवाडी या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोस्को कंपनीतील भंगारवरून हा वाद असल्याचे बोलले जात आहे. याआधी देखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. आज पोस्को कंपनीच्या कॉईल घेऊन जाणार्‍या गाडीवरील चालकाला मारहाण करण्यात आली. मात्र हा चालक स्थानिक असल्याने गावात बातमी पसरताच, 150 ते 200 ग्रामस्थ सुतारवाडी येथील ग्रीन ब्लॉसम या रिसॉर्टवर धडकले. आणि त्यांनी गाड्या फोडण्यास सुरुवात केली. यामध्ये पोस्को कंपनीच्या गाड्या, खाजगी वाहने अशा 20 ते 25 वाहनांचे नुकसान झाल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेनंतर या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top