पेण 

पेण येथील रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकार्‍यांची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी रवींद्र बाबू वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष पदी नरेश नथुराम हर्णेकर ,सचिव पदी रमाकांत बाळाराम गावंड व खजिनदार पदी रवींद्रसिंग  सत्तरसिंग गिरासे या पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड झाली.

अध्यासी अधिकारी जी.जी.मावळे यांच्या अध्यक्षतेखाली  पतसंस्थेच्या संचालकांची सभा पतसंस्थेच्या सभागृहात घेण्यात आली कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर नियम व अटींचे काटेकोर पालन करून घेण्यात आलेल्या या सभेस पतसंस्थेचे  13 संचालक उपस्थित होते. अध्यक्ष व इतर पदांसाठी  सदर पदाधिकार्‍यांचेच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची अध्यासी अधिकार्‍यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. नव निर्वाचित पदाधिकार्‍यांचे टी डी एफ नेते नरसु पाटील मार्गदर्शक जी.एम.पाटील संचालक प्रदीप मुरूमकर ,नरेंद्र मोकल , राजेंद्र पवार, दिनेश नागे, आदींसह उपस्थित संचालकांनी व कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 

 

अवश्य वाचा