रायगड
कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषदेमधून बदली झाल्यानंतर पुन्हा 6 जानेवारी रोजी मुख्याधिकारी डॉ. पंकज - पवार पाटील यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2020 रोजी त्यांना बदली आदेश देण्यात आले होते. मात्र, पवार -पाटील यांनी महाराष्ट्र अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे (मॅट) दाद मागितली. त्यामुळे बदलीला स्थगिती देण्यात आल्याने त्यांच्याकडे कर्जत नगरपरिषदेचा कार्यभार पुन्हा देण्यात आला आहे.
कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पवार -पाटील यांना 31 डिसेंबर रोजी बदली आदेश देण्यात आला होता. मात्र, त्यांनी कालावधी पूर्ण न झाल्याने याबाबत मॅटमध्ये दाद मागितली. तसेच, त्यांच्या जागी पनवेल नगरपरिषदेचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांच्याकडे कर्जत नगरपरिषदेचा कार्यभार देण्यात आला होता. पवार- पाटील यांची 14 फेब्रुवारी 2020 रोजी कर्जत नगरपरिषदेमध्ये तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या जागी बदली करण्यात आली होती.
कार्यकाळ पूर्ण न होताच त्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे पवार -पाटील यांनी महाराष्ट्र अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे दाद मागितल्यानंतर बदली आदेशाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे 6 जानेवारीपासून समीर जाधव यांच्या जागी पुन्हा पंकज पवार -पाटील यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे.