रायगड
। माणगांव । प्रतिनिधी ।
रायगडातील नवीन नागरपंचायतींना वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून नगरपंचायत माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा यांना खात्यामध्ये 3 कोटी रूपयांचा निधी जमा झाल्याची माहिती महाराष्ट्र शासनाचे अप्पर सचिव विवेक कुंभार यांनी पत्राद्वारे दिली आहे.
महाड,माणगांव विधानसभा मतदार संघाचे आ.भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांतून दक्षिण रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगरपालिकांसाठी गेल्या ऑगस्ट 2020 मध्ये निधी मिळविण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे.राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे आ.गोगावले यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यामुळे अनेक विकासकामांना मंजुरी मिळविण्यात यश आले आहे. माणगांव 1 कोटी 25 लाख, म्हसळा 45 लाख,श्रीवर्धन 1 कोटी 20 लाख, तळा 1 कोटी या नगर पंचायतीना मंजूर करण्यात आले आहेत.आगामी दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगांव नगरपंचायत हद्दीमध्ये मोठया प्रमाणात विकासकामे होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तर म्हसळा,श्रीवर्धन,तळा नगरपंचायतींना नगरविकास मंत्रालयाकडून निधी उपलब्ध झाला आहे.यावेळी शिवसेना नेते राजीव साबळे,इंदापूर सरपंच नवगणे,अजित तार्लेकर,सचिन बोंबले,नगरसेवक नितीन बामगुडे,सुनिल पवार,राजेंद्र नवगणे आदी उपस्थित होते.