Wednesday, May 19, 2021 | 12:56 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

जिल्हा सामान्य रुग्णालय ‘कोविड रुग्णालय’ घोषित करणार
रायगड
18-Apr-2021 12:10 AM

रायगड

जिल्हास्तरीय कोविड प्रतिबंधक उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री अदिती तटकरे यांची माहिती

 अलिबाग । विशेष प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती चिंताजनक होत आहे. मात्र शासन व प्रशासन जनतेला आवश्यक त्या आरोग्य सोयी-सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले. तसेच लवकरच जिल्हा रुग्णालयाला (सिव्हील हॉस्पिटल) ‘कोविड रुग्णालय’ घोषित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज (17 एप्रिल) सायंकाळी जिल्हास्तरीय कोविड प्रतिबंधक उपाययोजना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या.

या बैठकीला खा.सुनील तटकरे, आ.भरत गोगावले, आ.अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, तहसिलदार विशाल दौंडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

तर रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, खा.श्रीरंग बारणे, आ.रविंद्र पाटील, आ.बाळाराम पाटील, आ.महेंद्र थोरवे, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त संजय शिंदे, तहसिलदार विजय तळेकर, अलिबाग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.घासे यांची ऑनलाईन उपस्थिती होती.

पालकमंत्री आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेऊन जनतेला जास्तीत जास्त आरोग्य सोयी-सुविधा पुरविण्यात येतील. लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात येईल. मात्र त्याआधी खाजगी रुग्णालयांशी समन्वय साधून कोविड व्यतिरीक्त असलेल्या रुग्णांच्या उपचारासंबंधीची व्यवस्था व नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने योग्य ते नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील नवीन इमारतीत 90 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी शासनाकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य त्या प्रमाणात लस उपलब्ध करून देणेबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top