रायगड
पेण | वार्ताहार
पेण येथील विविध संस्थांचे प्रमुख अॅड. मंगेश नेने हे रविवारी ( दि. 28 फेब्रुवारी) खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मंगेश नेने हे स्वातंत्र सैनिक भाउसाहेब नेने यांचे नातू आहेत.
गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मंगेश नेने यांनी आपली पत्नी तेजस्विनी नेने यांना निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उभे होते आणि त्या विजयी देखील झाल्या होत्या. विकासकामांचे ध्येय नजरेसमोर ठेवत आता मंगेश नेने यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेउन राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी महात्मा गांधी वाचनालयाच्या पटांगणावर आपल्या समर्थकासह राष्ट्रवादी कॉॅँग्रेसमध्ये खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. नेने यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने पेण पालिकेतील सत्ताधार्यांना चपराक बसल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.