Wednesday, December 02, 2020 | 03:15 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

झेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....
रायगड
31-Oct-2020 04:47 PM

रायगड

 नेरळ 

कोरोना महामारीच्या काळात रायगड जिल्हा परिषदेतील शिक्षक आता संगणकाच्या माध्यमातून एकत्र येत असून कर्जत तालुक्यातील वाकस गटातील सर्व शिक्षक कॉम्प्युटर सेव्ही बनले आहेत.

 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्याने विद्यार्थांना शिक्षक हे ऑनलाईन पद्धतीने शिकवत असून त्यातून त्यांचा अभ्यास घेत आहेत. त्यासाठी शिक्षकांना तंत्र स्नेही बनविण्यासाठी कर्जत तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

गटशिक्षणाधिकार्‍यांचा पुढाकार

 जगाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांबरोबर आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत यासाठी सर्वांना संगणकाचे ज्ञान आणि संगणकावर सर्वांची बोटे वेगाने चालली पाहिजेत यासाठी पुढाकार घेत आहेत.कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दौड यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तालुक्यातील वाकस केंद्रामध्ये सर्व शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी प्रशिक्षण घेतले.त्यासाठी वाकस केंद्राचे केंद्र प्रमुख देविदास जाधव यांनी आपल्या विभागातील 100 टक्के शिक्षकांना तंत्र स्नेही करणेकामी प्रयत्न केले.

वाकस केंद्रातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकविणार्‍या शिक्षकांचे ऑनलाईन   प्रशिक्षण घेण्यात आले. त्या प्रशिक्षणास तंत्रस्नेही शिक्षक संजय थोरात, सहकारी शिक्षक रविंद्र पष्टे, रविंद्र थोरात यांच्या टीमने केंद्रातील 27 शिक्षकांना शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती चे प्रशिक्षण दिले. त्यात या केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षिका अंत्राट वरेडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका अश्‍विनी थोरात यांनी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पार पाडली.आपल्या शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड हे स्वतः झुम अँप द्वारे सहभागी झाले होते. प्रशिक्षण काळात त्यांनी शिक्षकांना काही सूचना देखील केल्या आणि कर्जत तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आवाहन केले.त्यावेळी शिक्षकांना अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर सहज पणे करता यावा,यासाठी सदर प्रशिक्षण उपयुक्त ठरले आहे.कर्जत तालुक्यात सर्व प्रथम वाकस केंद्रातील  शिक्षक यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊन स्वतःला संगणक प्रेमी म्हणून सिद्ध केले आहे.सदर प्रशिक्षण शिक्षकांना खूपच उपयुक्त ठरल्याचं प्रतिक्रिया शिक्षक व्यक्त करीत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top