Wednesday, December 02, 2020 | 12:21 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

कोरोनाच्या सावटामुळे जिल्ह्यातील यात्रा रद्द;
रायगड
21-Nov-2020 09:03 PM

रायगड

अलिबाग 

कार्तिक एकादशिपासून साजगाव येथील बोंबल्या विठोबाच्या यात्रेपासून रायगड जिल्ह्यातील यात्रांना सुरुवात होते. मोठया प्रमाणावर भाविक गर्दी करीत असल्याने जिल्हाभरात कोटयवधींची उलाढाल यात्रांमधून होत असते. मात्र कोरोनाच्या सावटामुळे यंदा यात्रांवर देखील गदा आली असून जिल्ह्यातील सर्वच यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासन तसेच देवस्थान समित्यांनी घेतला आहे. बोंबल्या विठोबा, वरसोली, आवास, चौल, मुरुड, पेण, रोहा, माणगाव, महाड, उरण अशा सर्वच तालुक्यातील यात्रांना हवशे नवशे मुकणार असले तरी भाविकांना या काळात नियमांचे पालन करुन दर्शनासाठी प्रवेश मात्र दिला जाणार आहे.

रायगड जिल्ह्याच्या यात्रोत्सवांना मोठी परंपरा लाभली आहे. संत तुकाराम यांचा पदस्पर्श झालेल्या खालापूर तालुक्यातील साजगाव येथील बोंबल्या विठोबाच्या यात्रेला कार्तिक एकादशी पासून प्रारंभ होतो. यंदा 25 नोव्हेंबरला सदर कार्तिक एकादशी असली तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा होणार नसल्याचे प्रशासन आणि देवस्थान समितीने जाहीर केले आहे. त्यामुळे भाविकांचा हिरेमोड झाला असला तरी दर्शन करता येणार असल्याने तितकेच समाधान देखील आहे. ही यात्रा संपल्यानंतर अलिबाग तालुक्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या नागोबा देवस्थान आवास येथे दि. 27 ते28 नोव्हेंबर अशी दोन दिवस होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात गुप ग्रामपंचायत आवास यांस कडून सर्व भाविक व दुकानदारांना कळविण्यात आले आहे . मात्र या दिवशी भाविकांना दर्शनासाठी श्री. नागोबा मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे सरपंच अभिजीत राणे यांनी सांगितले. त्यासाठी भाविकांनी मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मास्क चा वापर करणे बंधणकारक राहील. तोंडाला मास्क लावल्याशिवाय मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षी नागोबा आवास येथील यात्रेला रायगड जिल्हयासह राज्यातील अनेक ठिकाणाहून लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. तसेच वरसोली येथील विठोबा मंदिर परिसरातील यात्रा देखील प्रसिद्ध असून ती देखील रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिसेंबर दत्त पोर्णिमेला होणारी चौल भोवाळे येथील यात्रे प्रमाणेच , मुरुड, पेण, रोहा, माणगाव, महाड, उरण अशा सर्वच तालुक्यातील यात्रा रद्द करण्यात येणार आहे. या सर्व यात्रांसाठी मोठया प्रमाणावर व्यवसायीक रायगड जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे कोटयवधींची उलाढाल या यात्रांमधून होत असते. लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम झालेल्या अनेक व्यवसायिकांना या कालावधीत मोठी  आशा होती. मात्र तीही आता नाहीशी झाल्यामुळे विवंचनेत सापडले आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top