Monday, March 08, 2021 | 09:05 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मेढा येथे विश्‍वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
रायगड
20-Jan-2021 07:27 PM

रायगड

। खांब-रोहा । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील समस्त माऊली वारकरी सांप्रदायिक मंडळ मेढा विभाग पंचक्रोशी यांच्या वतीने मेढा येथे शुक्रवार, दि.22 ते सोमवार, दि.25 जानेवारी या कालावधीत विश्‍वशांती अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे सामुदायिक पारायण आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

   या सप्ताह सोहळ्यात शुक्र. दि.22 जाने. रोजी सायं 5  वा. प्रवचनसेवा. लिलाधरमहाराज खरिवले, भातसई यांची तर 7 ते 9 वा. गुरूवर्य नारायणमहाराज वाजे, पंढरपूर यांची कीर्तन सेवा व शनि. दि.23 जाने. रोजी सायं. 5 वा. प्रवचनसेवा बंद्रीमहाराज, खारगाव यांची तर 7 ते 9 वा. वर्षा शिंदे पाबळ-पेण यांची कीर्तनसेवा, तर रवि. दि.24 जाने. रोजी सायं. 5 वा. दिनेशमहाराज कडव, वांदोळी यांची प्रवचनसेवा व 7 ते 9 पुरूषोत्तम महाराज पाटील, धाटाव यांची कीर्तनसेवा त्याचप्रमाणे सोम. दि.25 जाने. रोजी स. 9 ते 12 वा. मारूती महाराज कोलाटकर तळवली यांचे काल्याचे कीर्तन तद्नंतर महाप्रसाद व श्रींची पालखी मिरवणूक आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या सर्व सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मेढा विभाग पंचक्रोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान आळी ग्रामस्थ, दत्तआळी ग्रामस्थ, विठ्ठलआळी ग्रामस्थ, गवळआळी ग्रामस्थ व मेढा नका ग्रामस्थ मंडळ मेढा मेहनत घेत आहेत.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top