Wednesday, December 02, 2020 | 02:04 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

आंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प
रायगड
31-Oct-2020 05:27 PM

रायगड

मुरूड जंजिरा  

मुरूड तालुक्यातील आंबोली धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तीन वर्षांपासून बंद पडल्याने हजारो शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकर्‍यांना पारंपरिक भात शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे.

आंबोली हे लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत धरण असून 29 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास 60 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकर्‍यांना पूरक व्यवसाय मिळणार आहे. सदर धरण मुरूड शहरासह 12 गावांची जीवनवाहिनी ठरली आहे. यामुळे पर्यटन क्षेत्र मुरूडला भेडसाविणारा पाणी प्रश्‍न कायम स्वरूपी सुटला आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांना धरणाचे पाणी कालव्याचे माध्यमातून सुटल्यास जोडधंदा मिळेल. हे काम रखडल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top