Thursday, December 03, 2020 | 12:07 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

लायन्स हेल्थ फाउंडेशनचे कार्य समाजाभिमुख
रायगड
25-Oct-2020 09:33 PM

रायगड

अलिबाग 

लायन्स हेल्थ फाउंडेशनने 2016 पासून जनसामान्यांना आधार आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सुरू केलेले हॉस्पिटल आज तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील लोकांसाठी दृष्टिदाता म्हणून कार्यरत असून लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या कार्याचा आदर्श जिल्ह्यातील सेवाभावी संस्था तसेच एनजीओ यांनी घ्यावा असे  प्रशंसोद्गार  आमदार जयंत पाटील यांनी  काढले.

 रायगड जिल्हा बँकेच्या प्रांगणात हॉस्पिटल करीता घेतलेल्या बस प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, डेप्युटी जनरल मॅनेजर मंदार वर्तक, लायन्स क्लबचे पदाधिकारी संजय पाटील,भगवान मालपाणी,अनिल म्हात्र,प्रवीण सरनाईक,अविनाश, नयन कवळे ,महेंद्र पाटील हे उपस्थित होते . या कार्यक्रमात लायन्स हेल्थ फाउंडेशन करिता बसप्रदान करण्यात आली .

 लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये आजवर 8000 पेक्षा अधिक नेत्रचिकित्सा करण्यात आलेल्या असून त्यापैकी 4000 पेक्षा अधिक ऑपरेशन्स मोफत करण्यात आलेले आहेत , जिल्ह्यातील खेड्यांमध्ये राहणार्‍या अनेक नागरिकांना मोफत सेवा येथे देण्यात आलेली असून या नागरिकांना येण्याजाण्याची सुविधा मोफत मिळावी तसेच त्यांना अधिक त्रास न व्हावा या दृष्टितकोणातून ही बस घेण्याकरिता लायन्स क्लबने निधी उभारायचा ठरविला होता याकरिता त्यांना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने 5 लाखाचा निधी देण्यात आला.  ही बससेवा सुरू केल्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा चांगला फायदा मिळणार असून रुग्णांना थेट घरापर्यंत ही सेवा मिळणार आहे त्यामुळे त्याचा निश्‍चितच मोठा फायदा हॉस्पिटला मिळणार आहे .

 लायन्स हेल्थ फाऊंडेशनने नेत्रतपासणीचे कार्यक्रम गावोगावी  घेतलेले असून त्यात अधिक लोकांनी सहभागी होऊन आपले आरोग्य जपावे तसे वेळीच डोळ्यांची काळजी घ्यावी , आणि या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आले.

अनिल म्हात्रे, रिजन चेअरमन प्रदीप सिनकर, झोन चेअरमन महेश मोघे,    लायन्स हेल्थ फाऊंडेशन चे खजिनदार  अरविंद घरत, लिबाग क्लबचे सचिव महेश चव्हाण, खजिनदार अविनाश राऊळ यांनी जयंत पाटील यांचे स्वागत केले.  लायन्सतर्फे आतापर्यंत  28000 पेशंट तपासले असून,  5500 ऑपरेशन झाली त्यापैकी 2500 ऑपरेशन मोफत करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top