Thursday, December 03, 2020 | 12:26 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

मच्छि सुकविणार्‍या महिला,खलाशांचा विशेष पॅकेजमध्ये समावेश...
रायगड
28-Oct-2020 08:02 PM

रायगड

अलिबाग 

 नैसर्गिक आपत्तीमुळे गतवर्षी संकटात सापडलेल्या मच्छिमारांना सरकारने क्यार आणि महा या दोन चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष पॅकेज जाहीर केले आहे. मात्र या पॅकेजमधून मच्छि सुकविणार्‍या महिला, खलाशी,वर काम करणारे आणि जाळी विणणारे यांचाही  सरकारने या पॅकेजमध्ये समावेश करावा,  अशी मागणी रायगड जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती संघाचे चेअरमन शेषनाथ कोळी यांनी सरकारकडे केली आहे.

गतवर्षी  क्यार आणि महा ही दोन चक्रीवादळ निर्माण झाली होती.  होते याचा फटका मोठ्या प्रमाणात रायगडातील मच्छिमारांना बसला. प्रमुख मासेमारी हंगामात पूर्ण क्षमतेने मासेमारीस जाता न आल्याने मच्छिमारांना मोठा तोटा सहन करावा लागला.यावरुन विविध मच्छिमार संघटनांनी सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली. रायगड जिल्हा मध्यवर्ती मच्छिमार संघानेही आपला प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. त्याची दखल घेत सरकारने सरकारने मच्छिमारांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली.मात्र या पॅकेजमधून सरकारने मच्छि सुकविणार्‍या महिला, खलाशी, वर काम करणारे आणि जाळी विणणारे यांचा समावेश करण्यात आलेला नाही.तो केला जावा,अशी मागणी शेषनाथ कोळी यांनी केली आहे.

दरम्यान, याही वर्षी सतत होणारी चक्रीवादळे,अवकाळी पाऊस यामुळे समुद्रातील मत्स्य उत्पादन घटले आहे.याचा परिणाम मच्छिमारीवर होत आहे.या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या सर्वच घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.शिवाय मासेमारी हंगाम सुरु होऊनही मच्छिमारी बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या नाहीत.याकडेही कोळी यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.यासाठी सरकारने याचीही नोंद घेऊन मच्छिमारांना अर्थसहाय्य करावे,अशी मागणीही कोळी यांनी केली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top