पाताळगंगा  

पावसाचे आगमन जवळ-जवळ तीन आठवडे लांबल्याने पाणी टंचाईची झळ अनेक गावांना बसत होती. तर अनेक ठिकाणी महिला पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. आदिवासी डोंगरातील आणि नदीच्या ठिकाणी खड्डा पाडून झर्‍यांच्या मार्फत पाणी पिऊन दिवस काढीत असल्याचे चित्र सर्वत्र ठिकाणी पहावयास मिळत होते. त्याचबरोबर गुरांच्या चार्‍यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला होती. परंतू गेले अनेक दिवस  वरूण राजाने कृपादृष्टी केली आहे.. दमदार पावसामुळे सर्वच ठिकाणी विहीर कालवे, ओढे  पाण्याने भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

गेले अनेक दिवस पावसाचे आगमन होत असल्यामुळे धरतीवर एक प्रकरचे चैतन्य निर्माण झाले आहे. कित्येक दिवस धरती अंगारा उधळणारी आज जणू या धरतीने हिरवी शालू परिधान केली कि काय असा भास प्रत्येकाला जाणवू लागले. पावसाच्या आगमनाने  शेतकर्‍याच्या पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्यामुळे बळीराजाला जगण्याची नवी उमीद निर्माण करून दिली असल्यामुळे बळीराजा सुखावला.

पावसच्या अगमनाने विविध ठिकाणी असलेले पाण्याचे स्त्रोत्र भरले असून पिण्याच्या पाण्याचे संकट टळले आहे. ज्या विहिरिने तळ गाठले होते. त्या विहरी पाण्यांने पुर्ण भरल्यामुळे गृहिणी समाधान व्यक्त करीत आहे. पाण्यासाठी जणू तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र गेले अनेक दिवस पावसाचे अगमन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....