नेरळ  

कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील पाली नवीन वसाहत या गावामध्ये जाणार्‍या रस्त्यात एका बांधकाम व्यावसायिकाने मातीचा भराव टाकला होता. मातीचा भराव चिखलमय झाला असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे.दरम्यान उमरोली ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांचा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य ललिता बांगारी यांनी केली आहे.

कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाली नवीन वसाहत हे गाव वसले आहे. पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली, त्यावेळी धरणासाठी पाली गावाने आपली जमीन दिली होती, त्या गावातील ग्रामस्थांचे पुनवर्सन डिक्सळ गावाजवळ करण्यात आले आहे. त्या एक हजार लोकसंख्या असलेल्या गावात जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता केला होता. या रस्त्याचा वापर ग्रामस्थ आणि पलीकडे असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये राहणारे लोक करीत असतात. पावसाळ्यापूर्वी त्या रस्त्यात एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या वाहनांच्या रहदारीसाठी रस्त्यावर मातीचा भराव टाकला होता.

मात्र, पावसाळ्यात या रस्त्याची आणखी दुरवस्था झाली आहे. मातीच्या भरावामुळे संपूर्ण रस्त्या चिखलमय झाला असून त्यामुळेच या रस्त्यावरून रहदारी करणे ग्रामस्थांना कठीण होऊन बसले आहे. रस्त्याने जाणारे दुचाकी वाहनचालकांना तर तारेवरची कसरत करून वाहन चालवावी लागत आहे. तर काही वेळेस घसरून पडून अपघात ही होत आहेत. रात्री-अपरात्रीचा या रस्त्यावरील प्रवास धोकादायक ठरू शकतो. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य ललिता बांगारी यांनी याबाबतीत संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन सदरच्या रस्त्यावर खडी टाकून रस्ता प्रवासायोग्य करावा अशी मागणी केली आहे.

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....