Wednesday, May 19, 2021 | 02:00 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

रोहे तालुक्यात लसीकरणास अत्यल्प प्रतिसाद
रायगड
06-Apr-2021 08:30 PM

रायगड

। रोहा । वार्ताहर । 

कोरोना लसीकरणाचा सध्या सर्वत्र गवगवा सुरू आहे.केंद्राकडून पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याचे राज्याकडून सांगण्यात येत आहे. तर आवश्यक साठा उपलब्ध करून दिला असल्याचे केंद्राकडून सांगण्यात येत आहे.या पार्श्‍वभूमीवर रोहा तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेतला असता मंगळवार पर्यंत केवळ 5450 व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाल्याची आकडेवारी प्राप्त झाली असून त्यापैकी केवळ 154 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

रोहा तालुक्यात 5 फेब्रुवारी पासून लसीकरणाला सुरुवात झाली.पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर,हेल्थ वर्कर यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक,सरकारी कर्मचारी, पोलीस,होमगार्ड, रेल्वे पोलीस, कोमोरबिड व्यक्ती,पत्रकार व त्यांचे नातेवाईक यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात कोकबन, नागोठणे व आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच रोहा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व केंद्रांवर मिळून दररोज सरासरी 350 ते 400 व्यक्तींना लसीकरण करण्याची तयारी आरोग्य यंत्रणेने ठेवली आहे.पण लसीकरणाबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये असणारी भिती तसेच ऑन लाईन रजिस्ट्रेशन बाबत असणारे अज्ञान यामुळे दिवसभरात केवळ 200 ते 225 नागरिकांचे लसीकरण होत असल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. रोहा उपजिल्हा रुग्णालयात 5 फेब्रुवारी ते 5 एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत 3354 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून 2089 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे 

तालुक्यातील महसूल कर्मचारी ,जिल्हा परिषद कर्मचारी,पोलीस ,होमगार्ड,रेल्वे पोलीस तसेच अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक, वीज महामंडळ, बँका यामध्ये कार्यरत असणार्‍या कर्मचारी वर्गाची संख्या जवळपास 2700 होईल.पण याबाबत अधिकृत आकडेवारी तालुका आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.कोरोना रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राज्यात राबविण्यात आली. सदर मोहिमेद्वारे स्थानिक हेल्थ वर्कर यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती दोन वेळेला जमा केली.या मोहिमेमुळे राज्याचा आरोग्य चार्ट तयार होईल असे खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले होते. यामुळे तालुक्यात 45 वर्षांवरील किती व्यक्ती आहेत याची माहिती सहज उपलब्ध होणे गरजेचे होते. पण तालुका आरोग्य यंत्रणेकडे याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे तालुक्यातील 45 वर्षांवरील किती व्यक्ती आहेत.व त्यातील किती नागरिकांचे लसीकरण झाले व किती नागरिकांचे लसीकरण अद्याप बाकी आहे याची आकडेवारी नसल्याने सर्व यंत्रणा रामभरोसे कार्यरत असल्याचे खेदाने नमूद करावे लागत आहे. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top