पनवेल  

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झालेल्या दरवाढीने सर्वत्र संताप व्यक्त होत असताना राज्यातील किरकोळ बाजारात करोनासारख्या महासाथीचा गैरफायदा घेत धान्य आणि भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात विक्रेत्यांनी भरमसाठ वाढ केल्याचे दिसून येत आहे.

घाऊक बाजारात आठ रुपये प्रति किलो असलेला कांदा किरकोळ बाजारात चाळीस रुपये किलोने विकला जात आहे, तर साठ रुपयांचा लसूण तिप्पट दराने खरेदी करावी लागत आहे. काही प्रमुख भाज्यांसाठी दुप्पट दर आकारले जात आहेत. किरकोळ बाजारावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने ग्राहकांना ही दरवाढ निमूटपणे सहन करावी लागत आहे.

एपीएमसी घाऊक बाजारात कांदा, बटाटा, लसूण, तांदूळ, गहू, तूरडाळ, मसूरडाळ, तेल, साखर, नारळ, अनेक भाज्या यांचे दर गेल्या काही महिन्यांत स्थिर आहेत. मुंबई आणि उपनगरांतील किरकोळ बाजारात मात्र त्यांचे दर दुप्पट किंवा तिप्पट आकारले जात आहेत. भेंडी, फ्लॉवर, कोबी, गाजर, टोमॅटो या सर्वाधिक मागणी असलेल्या भाज्या 80 ते 120 रुपये किलोने किरकोळ बाजारात विकल्या जात आहेत मात्र या भाज्या घाऊक बाजारात 20 ते 30 रुपये प्रति किलो आहेत.

 

अवश्य वाचा