पनवेल  

जगभरात पसरलेल्या करोना विषाणूची लागण राज्यातील भागात झाली आहे. सदर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना लागू केल्या. त्यादृष्टीने पनवेलमधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील गर्दीचे असे खाणे यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल सह कोळीवाडा परिसरातील मच्छी व मटण मार्केट पुढील आदेश मिळेपर्यंत बंद करण्याचे आदेश पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत.

आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला. त्यानुषंगाने कोरोना विषाणू संक्रमण वाढणार नाही यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणुंचा प्रसार व संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने कृषी उत्पन बाजार समिती, पनवेल येथील सर्व भाजी मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तसेच पनवेल, कोळीवाडा येथील मच्छी मार्केट, चिकन/मटन विक्रेते हे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. तसेच याठिकाणचे मार्केट पुर्णपणे बंद ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेच्या पदाधिकार्‍यांची राहणार असून या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांविरुध्द साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यात येण्याचीही नमूद करण्यात आले आहे.