पनवेल 

   पनवेलच्या तक्का येथील महानगर पालिकेच्या स्मशानभूमीत  दररोज  फूल भाज्यांचा  मळा फुलू लागलांय. या करीता ओम साई मित्र मंडळ आणि दर्यासागर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश मारुती वाघिलकर  यांच्यासह  सर्व सहकारी मेहनत प्रामाणिक पणे  देखभाल  करीत आहेत.  विशेष म्हणजे या स्मशानभूमी मधील   सोनचाफ्याची फुले भारतरत्न स्वर साम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याही  घरात गेली असून पूजेकरीता गेली असून,ती मंगेशकर यांच्या देवांना वाहण्यात आलीत.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी कडून सुद्धा येथील सोनचाफाची फुले एकवीरा देवी च्या चरणी वाहिली गेली आहे.

स्मशानच्या मोकळ्या जागेत पडलेला रेबिट काढून  गणेश वाघीलकर यांच्या मनात या ठिकाणी फुलभाज्याची शेती करण्याचा ही संकल्पना आली. व त्यांनी ती अंमलात आणून कामाला सुरुवात केल्यावर स्मशानभूमीचेर रुपच पालटून गेलंय.  वांगी, आळुची पाने, माठाची पालेभाजी, तोंडली, लिंबु, गुलाब, मोगरा, शेवगा, तुळस, फुलझाडे विविध प्रकारचा सोनचाफा, कवठीचाफा,  हिरवाचाफा, जास्वंदी, तगडी, तेरडा, प्राजक्ता, झेंडु, रातराणी, अबोली,  पुजेचे बेल, दुर्वा, शमी, फळझाडे, नारळ, आंबा, आवळा, फणस, जाम, कोकम, चिकु, सिताफळ, चिंच, बोरं, अननस, पपई, भाजी, कढिपत्ता, गवती चहा, भेंडी, मिरची, कारली, शिरवली, घोसाळी, दोडका, भोपळा, तीळ, घेवडा, निलगीरी, पेरु, कृष्णकमळ, ब्रम्हकमळ, सदाफुली बहरून गेला आहे.

 येथील सफाई कामगार रमेश महादेव गरुडे यांनी याच स्मशान भूमि मध्ये अभ्यास करुन यशवंतराव चव्हाण विद्यापीठातुन ग्रज्युॅएशन पुर्ण केले आहे. आज अनेक नागरिक मॉर्निंग वॉकला येथे येतात. शाळा महाविद्यालय विद्यार्थी येथे अभ्यास करतात काही या ठिकाणी विविध पक्षांनी आपली घरटी बांधली आहेत. ऊन्हाळ्यात पाण्याचे पंप गाढीनदीत लाऊन पाणी मारले जाते. स्मशान भूमि मध्ये स्वच्छता नेहमीच ठेवण्यात येते. या मळ्याची देखभाल गंगाराम बेटकर, महादु शैळके, करतात या स्मशान भूमि मध्ये आल्यावर अनेकाच्या मनातील भीति निघून गेली असून आनंद काय असतो याचा अनुभव पाहायला मिळतो.

अवश्य वाचा