उरण,

 कोरोना कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव वाढला आहे. त्याची खबरदारी म्हणून उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे गोपाळ पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मर्क्स कंपनीने उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला 500 पीपीइ किट मोफत दिले आहे.

     बाजारभावा प्रमाणे किंमत 5 लाखाच्या वरती असल्याचे समजते. सदर किट मिळावे म्हणून उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष  जेष्ठ समाजसेवक गोपाळ पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. सदरचे किट काल जेष्ठ समाजसेवक गोपाळ पाटील यांनी कंपनीच्या वतीने हे किट उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज भद्रे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉक्टर मनोज भद्रे यांनी मर्क्स कंपनीने मोफत 500 पीपीइ किट दिल्याबद्दल व त्यासाठी पाठपुरावा करणारे जेष्ठ समाजसेवक गोपाळ पाटील यांचेही आभार मानत या किटचा वापर लवकरात लवकर करू असे सांगितले.

 

अवश्य वाचा