Monday, January 18, 2021 | 05:01 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

कर्जतमध्ये राजमुद्राचे अनावरण
रायगड
13-Jan-2021 02:21 PM

रायगड

। कर्जत । वार्ताहर ।

कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये राजमुद्राचे अनावरण करण्यात आले, यावेळी राजमुद्रा स्तंभाचे लोकार्पण करण्यात आले.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मिळालेल्या प्रोत्साहनपर अनुदानातून 2 लाख रुपये खर्च करून स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब राऊत चौक ते मुरबाड हायवेला मिळालेल्या रस्त्यावर भगवान भोईर यांच्या घरासमोरील चौक सुशोभिकरण करण्यात आला. या चौकात स्तंभावर राजमुद्रा अनावरण करण्यात आली. स्तंभाचे लोकार्पण नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका पुष्पा दगडे, विशाखा जिनगरे, संचिता पाटील, वैशाली मोरे, स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, नगरसेवक नितीन सावंत, बळवंत घुमरे, माजी नगरसेवक संतोष पाटील, प्रशांत पाटील, संदीप भोईर, अरुण निघोजकर, विजय जिनगरे, नगरपरिषद कर्मचारी कल्याणी लोखंडे, ऋषिता शिंदे उपस्थित होते. लेखनिक रविंद्र लाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top