Monday, March 08, 2021 | 08:50 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

व्यवसायात अनुभवाचं विद्यापीठ मोठं
रायगड
25-Jan-2021 06:23 PM

रायगड

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

 नवीन मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी अलिबाग येथील मॅपल आयव्ही या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.हि कल्पना चित्रलेखा पाटील यांची होती.या कार्यक्रमाला आ.जयंतभाई पाटील,चित्रलेखा पाटील,संकेत नाईक उपस्थित होते व त्याच बरोबर कोकणचे सीईओचे संस्थापक,आयआयबीएस अकॅडमियाचे सीईओ निलेश सरावते आणि बिझनेस लाईफ कोच डॉ.श्‍वेता अवर्सेकर हे मान्यवर म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी उपस्थित उद्योजकांचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमता आ.जयंतभाई पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,उद्योजक म्हणून पी.एन.पी,आरडीसीसी बँक कशी काढली याची माहिती दिली.40 वर्षां पूर्वी अलिबाग वेगळे होते.आधी अलिबागमध्ये दोनच उद्योग होते,ते म्हणजे प्रिंटिंग प्रेस आणि खासगी प्रवासी वाहतूक. पण आता अलिबागचा विस्तार खूप वाढला आहे आणि प्रगतीही झाली आहे.पुढच्या काळात देखील खूप व्यवसाय कारायचे मार्ग मोकळे होतील असे प्रतिपादन आ.जयंत पाटील यांनी केले.पुढच्या 10 वर्षात पर्यावरणाशी निगडित असलेले कायदे सक्ती आणि एकंदरीत पर्यावरणाला खूप महत्व दिल जाईल.त्यामुळे पर्यावरणाशी संबंधित व्यवसाय येणार्‍या काळात त्याला चांगला वाव मिळेल.ऍग्रो टूरीझम अलिबागमध्ये पहिले मी आणले आणि आज अलिबागेत पर्यटनाचा खूप मोठा व्यवसाय आहे.अलिबाग आता लवकरच मुंबईमध्ये समाविष्ट होणार आहे.त्यामुळे स्थानिक लोकांनी कोणता उद्योग करायचा याचा आधीच विचार करायला पाहिजे.व्यवसाय करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभा राहायची जिद्द पाहिजे.

जयंत पाटीलांनी एक महत्वाच मुद्दा सांगितला की,व्यवसायात यशस्वी झाल्यनानंतर आपण कोण आहोत ते विसरता कामा नये आणि मिळकत वाढली म्हणून खर्च वाढवायचे नाही.तुम्ही गुणवत्तेवर व्यवसाय करायला हवा.रायगडमध्ये खूप पायाभूत सुविधा आहेत,मार्केट आहे त्याचा उपयोग स्थानिक व्यावसायिकांनी केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top