अलिबाग,

 अलिबाग न पा हद्दीत श्रीबाग येथे भूमीगत विद्युत वाहिन्याच्या कामाचा प्रारंभ नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते शनिवारी म्हाडा कॉलनीतून करण्यात आला.

यावेळी गटनेते प्रदीप नाईक, बांधकाम सभापती गौतम पाटील, नगरसेवक महेश शिंदे, अनिल चोपडा, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्तीकाळात समुद्रकिनार्‍या लगतच्या शहर,गावातील विद्युत पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहाय्याने भूमिगत विद्युत वाहिनी योजना आखली आहे. ही योजना सध्या अलिबाग तालुक्यात प्रायोगित तत्वावर राबविली जात आहे. त्या कामाचा अलिबाग शहरातील कामांचा प्रारंभ म्हाडा कॉलनीतून करण्यात आला आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त