Wednesday, December 02, 2020 | 02:46 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

पाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम
रायगड
31-Oct-2020 05:23 PM

रायगड

नेरळ

कर्जत तालुक्यातील  पाली भूतीवली या लघुपाटबंधारे प्रकल्प परिसरात निर्बंध असलेल्या जागेत आता हॉटेल व्यवसाय सुरू करण्यसाठी बांधकाम केले जात आहेत. यापूर्वी उन्हाळ्यात कापडी टेंट उभे करून व्यवसाय करणारे आता अनिधिकृत बांधकामे करीत असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही धरणाच्या साठा परिसरात खोदकाम,बांधकाम करण्यास बंदी आहे. परंतु पाली भूतीवली धरणाच्या जलसाठ्याजवळ बांधकाम सुरू करून हॉटेल व्यवसायकांची मुजोरी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई सर्वाधिक असलेला रेल्वेपट्टा हिरवागार होण्यासाठी राज्य सरकारने पाली भूतीवली धरण बांधण्याचा निर्णय घेतला.धरण बांधल्यामुळे धरणातील पाण्यावर आसपासच्या गावाची तहान भागवली जात आहे.मात्र धरण किंवा पाणवठे निर्माण झाले की तात्काळ पर्यटक येण्यास सुरुवात होते.असेच पर्यटक पाली भूतीवली मध्ये येऊ लागले आणि त्यांच्यासाठी कापडी तंबू उभारून राहण्याची व्यवस्था केली जाऊ लागली.मात्र गेल्या काही वर्षात या परिसरात मद्यपिनी धुडकूस घातल्याने,मद्यपान करून नंतर पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या असंख्य पर्यटकांचे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाले आहेत.त्यामुळे धारण परिसरात 500 मी आत कोणीही प्रवेश करू नये असे पोलिसांनी फलक लावले आहेत.पण तरीही पर्यटक येण्याचे काही थांबत नाहीत.अशा पर्यटकांसाठी रूम बांधण्याचे काम काही हॉटेल व्यवसायिक यांनी सुरू केले आहे.धरणाच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास शासनाकडून परवानगी नाही. बांधकाम व्यवसायकांनी चक्क खोदकाम करून बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे.

नियमांची पायमल्ली करून या परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम करून धरणाची मजबुती कमी करण्याचे काम सुरू केले आहे. धरणाच्या जलाशयाजवळ विना परवाना आणि दिवसाढवळ्या बांधकाम केले जात असून धरणाची मालकी असलेल्या पाटबंधारे विभागाला त्याबाबत कोणतेही सोयरसुतक नाही.याबाबत आता बांधकाम व्यवसायीकावर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे. वेळीच अशा अनधिकृत बांधकाम आणि व्यवसायिकांना आळा घालून धरणाच्या जागेत काटेरी कुंपण घालण्याची मागणी होऊ लागली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top