पनवेल 

 जागतिक आदिवासी दिन हा 9 ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो  माञ, या वर्षी कोरोना महासंकट व लॉकडाऊन असल्याकारणाने सर्व ठिकाणी शासनाचे नियम पाळून आदिवासी कार्यकर्त्यांनी जागतिक आदिवासी दिन साध्या सोप्या पध्दतीने साजरे केले.

पनवेल तालुक्यामध्ये धोदाणी, मालडूंगे परिसरात काही वर्षांपूर्वी आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून हुतात्मा नाग्या महादू कातकरी चौक असे नामकरण करण्यात आले होते. या हुतात्मा नाग्या कातकरी चौक जवळ आदिवासी क्रांतिकारकांना मानवंदना करण्यासाठी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते एकञ येवून हुतात्मा नाग्या कातकरी व क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छञपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, हुतात्मा नाग्या कातकरी, क्रांतीकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्यासह अन्य क्रांतीकारकांना मानवंदना देखील करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या संकटात लढणार्‍या योध्द्यांचा सन्मान करण्यात आला.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही