नवीन पनवेल

ब्राह्मणसभा, नवीन पनवेल पुरस्कृत मकलादर्पणफ या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली.  लॉकडाऊनमुळे सर्व कलाकारांनी एकत्र न येता आपल्या घरातूनच ऑनलाईन पद्धतीने सादरीकरण केले. ब्राह्मणसभेचे अध्यक्ष डॉ. अरविंद बेलापूरकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम रसिकार्पण करण्यात आला.  साहित्यिक शंकर आपटे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली काव्य, गीते, पोवाडे यांचे गायन, रसग्रहण तसेच नाटक व पुस्तकांमधील उतार्‍यांचे अभिवाचन असे 28 कलाकारांनी मिळून सादर केले. प्रसिद्ध निवेदिका प्राची देशपांडे यांनी कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन केले.  माधव भागवत याने गायकांना तबलासाथ केली. पद्मनाभ भागवत यांनी तंत्रसहाय्य करून निर्मिती केली. 

 

अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ