सुतारवाडी 

येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विविध मान्यवरांचे वृक्ष भेट देऊन वृक्ष जनजागृती करणेत येत आहे. मानवाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, निसर्गाचे संतुलन राखणे, महापूर यापासून बचाव करणे, थंड सावली देणे, फळे, फुले यांचे सौंदर्य देणे, विविध औषधी वनस्पतीसाठी अशा विविध प्रकारे वृक्षांचे महत्व असल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृक्ष वाचवा वृक्ष जगवा ही मोहीम हाती घेतली असून प्रत्येकांनी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे संघाच्या वतीने आवाहन करणेत आले आहे. 

या मोहिमेसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, विदर्भ सरचिटणीस शेखर बोरकर, भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ.देवानंद नंदागवळी, उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने, जिल्हा कोषाध्यक्ष प्रविण भोंदे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.