जेएनपीटी

उरण तालुक्यातील तळीरामांना लॉकडाऊनच्या कालावधीत दारु उपलब्ध होत नसल्याने, अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच पोलीस, उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यात धुळफेक करत चक्क आपल्या वाहनांवर महाराष्ट्र शासन, पोलीस अशा प्रकारच्या पाट्या लावून खुलेआम दारु व अंमली पदार्थांची वाहतूक सुरू आहे.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील वाईन शॉप, बिअर शॉप वर शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करत दारु विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. उरण, पनवेल तालुका वगळता इतर तालुक्याच्या शहरी, ग्रामिण भागातील वाईन शॉपवर दारु पिण्याचे लायसन्स असणार्‍यांना मद्य उपलब्ध होत आहे.

मात्र नवीमुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणार्‍या उरण, पनवेल तालुक्यात दारू उपलब्ध होत नाही. या परिसरातील तळीरामांनी नवी शक्कल लढवली आहे.

महाराष्ट्र शासन, पोलीस अशा प्रकारची पाटी असणारी वाहने रस्त्यावर धावताना कोणीही अडवत नसल्याने आज प्रकल्पात सुरक्षारक्षक म्हणून ड्युटी बचावणारे सीआयएसएफचे जवान, शासकीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी व त्यांचे नातेवाईक, मित्र हे आपल्या वाहनावर महाराष्ट्र शासन, पोलीस अशा प्रकारची पाटी लावून खुलेआम दारुची वाहतूक करत आहेत.

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!