Wednesday, May 19, 2021 | 02:16 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सुधागड तालुक्यात 3 नवे रुग्ण
रायगड
04-Apr-2021 07:01 PM

रायगड

पाली/बेणसे | प्रतिनिधी ।

सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा भडका उडत आहे.   शनिवारी (दि.3) सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाच्या 3 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे 29 सक्रिय रुग्ण असून हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणमध्ये उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली.

तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 509 रुग्ण झाले असून 454 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती देखील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली आहे. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून योग्य खबरदारी व काळजी घ्यावी आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top