Thursday, January 21, 2021 | 12:25 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

रायगडसह ठाणे, पालघरमधील हजारो नौका किनार्‍यावरच
रायगड
01-Dec-2020 09:08 PM

रायगड

अलिबाग  

लॉकडाऊन, चक्रीवादळ आणि आता पुन्हा एकदा वादळ तसेच मतलई वार्‍यांमुळे आधिच नुकसानीच्या खाईत लोटल्या गेलेल्या मच्छिमार समाज त्रस्त झाला आहे. वादळ तसेच मतलई वार्‍यांमुळे रायगडसह ठाणे पालघरमधील हजारो नौका किनार्‍यावरच आहेत. त्यामुळे मासळीचाही दुष्काळ पडण्याची शक्यता नाकारताय येत नाही.

थंडीच्या मोसमात पहाटेच्या सुमारास वाहणार्‍या मतलई वार्‍यांनी म्हावरं खवय्यांचे बजेट साफ बिघडवले आहे. या मतलईवार्‍यांमुळे दुपारनंतरही जाल्यात मासली गावत नसल्याने ठाणे, पालघर, रायगडातील हजारो मच्छीमार नौका किनार्‍यावरच नांगर टाकून बसल्या आहेत. त्यामुळे हलवा, पापलेट, घोळ, कोळंबी, बांगडयाचे भाव कडाडले असून आठवडयातून पाच दिवस मच्छीवर ताव मारणार्‍या अस्सल खवय्यांच्या खिशाला मात्र चाट बसत आहे. कोरोनाच्या संकटानंतर यंदाची मासेमारी सुरू झाली. परंतु ऑक्टोबरपर्यंत वातावरण बदलाचा फटका बसला होता. नोव्हेंबर महिना मच्छीमारीसाठी चांगला जाईल, अशी अपेक्षा असताना आता मतलई वार्‍यांच्या मोसमामुळे जाळयात मासळी गावेना झाली आहे, मासळीच मिळत नसेल तर समुद्रात बोटी लोटून त्याचा खर्च निघणार कसा, त्यामुळे म्हावरं चढया भावाने विकावे लागत असल्याचे मुरुड येथील मच्छीमार प्रकाश सरपाटील यांनी सांगितले. मतलईच्या वेगवान वार्‍यांमुळे समुद्रातील पाण्याला करंट बसतो. त्यामुळे किनारा परिसरात असलेली मासळी खोल समुद्रात जाते. यातच या वाऱयांमुळे दुपारपर्यंत समुद्राचे पाणी अस्थिर राहात असल्याने खोल समुद्रात जाऊनही मासे मिळत नसल्याने ठाण्यातील उत्तन, पालघरमधील वाढवण, उच्छेळी, दांडी, डहाणू तर रायगडमधील उरण, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनमधील हजारो मच्छीमारांनी नौका बंदरातच उभ्या केल्या आहेत. परिणामी मासेमारीअभावी तुटवडा निर्माण झाल्याने मासळीचे भाव कडाडले आहेत. सरंगा, सुरमई, पापलेट, हलवा, बांगडयाला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे किलोभर मासळी घेणारे अर्ध्या किलोवर आले आहेत आणि ज्यांना परवडत नाही त्यांना बाजारात गेल्यानंतर केवळ टोपलीत डोकावण्यावर समाधान मानावे लागत आहे.

आधीच कोरोना महामारीमुळे माशांना कमी मागणी आहे. वादळ आणि आता मतलई वार्‍याच्या फटक्यामुळे मासळी मिळेनाशी झाल्याने मच्छिमारांनी बोटी किनार्‍यावरच नांगरून ठेवण्याची वेळ आली आहे. जे मासेमारी करत आहेत, त्यांच्यासमोर खर्चाची मिळवणी करण्यासाठी म्हावर्‍याचे भाव वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

शेषनाथ कोळी

अध्यक्ष -रायगड जिल्हा मच्छिमार संघ

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top