नेरळ 

कर्जत तालुक्यात कोविड रुग्णालय व्हावे यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली आहे.  दरम्यान, कर्जत तालुक्यात सध्या कोणत्याही प्रकारचा लॉक डाऊन न घेता आधी कोविड रुग्णालय हा अजेंडा कर्जत तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी निश्‍चित आहे.

कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे शिष्टमंडळाने आज 2 जुलै रोजी प्रांत अधिकारी कार्यालयात प्रशासनाबरोबर चर्चा केली. आ. महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ प्रशासनाला भेटले. त्यात रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, विलास थोरवे, भरत भगत, तानाजी चव्हाण, प्रवीण गंगाल यांच्यासह व्यापारी, नागरिक उपस्थित होते.

प्रशासनाकडून कोविड वर नियंत्रण आणण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती सर्वपक्षीय शिष्टमंडळाला देण्यात आली.  डॉक्टर मोरे आणि बनसोडे यांनी कोरोनाबाबत माहिती दिली.  

 

अवश्य वाचा