रायगड
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील लहुळसे गावातील एका लाकडी घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.हळदुळे गावातील सीताराम भागोजी रिंगे, कोंडीराम रिंगे, भिकू रिंगे, पांडुरंग रिंगे, मुंताबाई रिंगे असे एकत्रित राहणारे 7 खोल्यांचे लाकडी घर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक सर्व्हीस केबलने मेनस्वीचजवळ ठिणग्या उडून पेट घेतला. यामुळे संपूर्ण घराने पेट घेतला. यादरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी आगीपासून घर वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरही निमुळते रस्ते आणि पाण्याअभावी आग विझवणे अशक्य दिसून आले. पोलादपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्यांनी तातडीने आगीच्या घटनास्थळी धाव घेऊन सर्व परिस्थिती आटोक्यात आणली. महाड औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन यंत्रणा आणि महाड नगरपालिका अग्निशमन यंत्रणांनी आग विझविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. पोलादपूर महसूल विभागाने तातडीने नुकसानीचा पंचनामा केला तर महावितरणने परिसरातील घरे आणि इमारतींना दिलेल्या विद्युतपुरवठ्याची तपासणी केली.