Thursday, December 03, 2020 | 12:51 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

चक्रीवादळात उध्वस्त झालेली भोस्ते आदिवासी वाडी सावरली
रायगड
28-Oct-2020 07:52 PM

रायगड

श्रीवर्धन  

दि. तीन जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात अनेक आदिवासी वाड्या प्रभावित झाल्या. अनेक घरांवरचे पत्रे उडाले , घरे पडली , भिंती पडल्या. 5 जूनला वनवासी कल्याण आश्रमाने टीम तयार करून वनवासी भागात पाहणी केली. किती गावात पत्रे , ताडपत्री यांची गरज आहे आणि किती गावे पूर्णपणे प्रभावित झाली आहेत, याची पाहणी झाली त्या नुसार योजना करून वेगवेगळी मदत देण्याचे काम सुरू झाले. एकूण 12 गावात पत्रे व ताडपत्री वाटप करण्यात आले आणि श्रीवर्धन तालुक्यातील मभोस्ते आदिवासी वाडीफ ही 16 घरांची वाडी पूर्णपणे प्रभावित झाली होती.या वाडीचे पुनर्वसन करण्याचे निश्‍चित करण्यात आले. हे कार्य करण्यासाठी मुंबई अंधेरी येथील प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्ट च्या सहकार्याने ह्या वाडीचे पुर्नवसन करण्यात आले. आणि ह्या वाडीतील आदिवासी परिवारांचा गृहप्रवेश 1 नोव्हेंबर रोजी होत आहे . सर्व समाज सोबत असल्यावर संकटे कतीही आली तरी त्यावर मार्ग हा निघतोच.नविन घरे बांधुन मिळाल्यामुळे आदिवासी बांधव आनंदित असल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top