अलिबाग

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी रायगडात उसंत घेतली. गुरुवारी हाहाकार माजविणारा परतीचा पाऊस रायगडातील काही परिसरात तुरळक प्रमाणात कोसळला.

रायगड जिल्ह्यात गुरुवारी 96 मिलिमिटर पावसाची नोंद झाली होती. या पावसाने कापणीसाठी तयार झालेले आणि कापणी झालेले भाताचे पीक उद्ध्वस्त केले. नदी, नाल्यांची पातळी वाढली तर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकाही परत फिरल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी रायगड जिल्ह्यात 3.2 मिमि पावसाची नोंद झाली. कोकण विभागात सरासरी 12.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद  सिंधुदुर्ग जिल्ह्यात 30.2 मि.मी. झाली आहे.

कोकण विभागातील ठाणे 1.2 मि.मी., पालघर 2.2 मि.मी., रायगड 3.2 मि.मी., रत्नागिरी 20.8 मि.मी., सिंधुदुर्ग 30.2 मि.मी. असा पाऊस झाला. आतापर्यंत विभागात एकूण सरासरी 156.4 इतका पाऊस झाला आहे. जूनपासून सुरु झालेल्या पावसाने सरासरी ओलांडली असून ठाणे 2512.5 मि.मी., पालघर 2492.7 मि.मी., रायगड 2709.0 मि.मी., रत्नागिरी 3654.7 मि.मी., सिंधुदुर्ग 4328.9 मि.मी. अशी नोंद झाली आहे. 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त