आंबेत  

म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणार्‍या पांगलोली परिसराची बिकट अवस्था झाली असून चक्रीवादळ येऊन महिना उलटला तरी अद्याप या गावात ना वीज पोहचली ना मोबाईल टॉवरची सेवा सुरू झाली आहे. आजही येथील नागरिक एखादा फोन करायचा झाला तर 10 ते 12 किमी अंतरावरील  परिसरात फोन करण्यासाठी जात असतात. त्यामुळे 15 वर्षांपासून कार्यरत असलेली बीएसएनएल या कंपनीची सेवा एखाद्या पडक्या वाड्याप्रमाणे ठप्प पडून आहे.

चारशे घरांची वस्ती आणि आजूबाजूला असणारी इतर गावे हि याच दूरध्वनी टॉवरवर अवलंबून असल्याने आज अनेक प्रश्‍न या ठिकाणी भेडसावताना दिसत आहेत. गावातील बँक ऑफ इंडिया शाखेची बँक ही अपुर्‍या इंटरनेट सेवाअभावी बंद झाल्याने याच शाखेची गावात सेवा उपलब्ध करून देण्यासाठी  छोटी शाखा की जेथे नागरिकांना आपले पैसे जमा अथवा काढण्याची मुभा गावकर्‍यांनी तयार केली असून भविष्यात मोबाईलची अपुरी सेवा ही अनेक सोयीसुविधांवर अवलंबून असल्याकारणाने अनेक व्यवहार ठप्प होण्यास कारणीभूत ठरल्याचे वावगे ठरणार नाही.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद