पाली/बेणसे 

 सुधागड तालुक्यातील खाजगी दवाखान्यात तपासणी व उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप व श्‍वासनास त्रास ही कोरोना सदृश लक्षणे दिसून आल्यास त्या रोग्यांची माहिती तालुका वैद्यकीय विभागाला कळवावी असे आवाहन पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी तालुक्यातील खाजगी डॉक्टरांना केले आहे. जेणेकरून कोरोनावर तातडीने उपयोजना करण्यासाठी प्रशासनास मदत होईल असे तहसीलदारांनी सांगितले.यासंदर्भात पाली तहसीलदार रायन्नावार यांनी  कार्यालयात खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली, व सूचना केली.

   सुधागड तालुक्यात कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुका आता सामाजिक संक्रमणाच्या जवळ येत आहे. त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे नाव व गावचे नाव व संपर्क क्रमांकासह सविस्तर माहिती दररोज सायंकाळी सात वाजेपर्यंत डॉक्टर नंदकुमार मुळे - वैद्यकीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून पाठविण्यात यावी असे आवाहन पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे. तसेच वेळेत माहिती सादर केल्यास प्रशासनास त्यावर त्वरित उपाययोजना करण्यास मदत होईल. या सहकार्यामुळे सुधागड तालुका कोरोना प्रादुर्भाव संक्रमणापासून दूर राहील असे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले.

अवश्य वाचा