जेएनपीटी   

 माझे कुटुंब, माझी जबाबदारी या कामावर घरोघरी जावून सर्व कुटुंबाची माहिती घेऊन ती अँपवर डाऊन लोड करण्याची जबाबदारी सी.ई.ओ रायगड यांनी शिक्षकांवर टाकल्याने शासनाच्या परिपत्रकात जे काम शिक्षकांना नाही ते काम शिक्षकांना दिल्याने सर्व शिक्षक संघटनांनी माझे कुटुंब सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.आणि तशा प्रकारचे निवेदन पत्र रायगड जिल्हा परिषदेकडे सादर केले आहे.

  या अगोदर कामगारांना त्यांच्या गावात एस टीत सोडणे ,घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे ,कोविड रूग्न ट्रेसिंग करणे हे काम मार्च पासून शिक्षक करत आहेत .हे कमी पडलं तर सी ई ओ नी आता शिक्षकांवर पुन्हा घरोघरी माझे कुटुंब च्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली परंतु शिक्षकांच्या कोविडच्या डुटी 14 सप्टेंबर च्या आदेशाने रद्द केल्या आहेत. तरी रायगड जिल्हयातील सर्व शिक्षकांना कामावर बोलविले असल्याने जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनाने रायगड जिल्हा परिषदेचे सी ई ओं ची  जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी ( दि22) भेट घेऊन बहिष्काराचे निवेदन पत्र सादर केले.यावेळी जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

अवश्य वाचा