अलिबाग 

नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्याकडे  सकारात्मक दृष्टीने प्रभावी जनजागृती व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या  दि. 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2020 या कालावधीत म गंदगी मुक्त भारत म मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये  लोकांनी सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 याच विषयाच्या अनुषंगाने डॉ. किरण पाटील यांनी विडिओ कॉन्फरन्सद्वारे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकार्‍यांशी संवाद साधला. ते म्हणाले प्रभावी संवाद हा अभियानाचा आत्मा आहे. स्वच्छता ही लोकचळवळ बननावी. शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, प्लस्टिक बंदी आदींद्वारे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत प्रभावी स्वच्छता केल्यास कोरोना नियंत्रणास मदत होईल. लोकप्रतिनिधींनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा.  स्वच्छतेचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी स्वयंसेवी संस्था, व्यक्ती,  एनएसएस व नेहरू युवा केंद्र आदींचे या स्वच्छता उपक्रमासाठी योगदान महत्वाचे ठरणार आहे. हे अभियान गावस्तरावर सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन गावस्तरावर यशस्वी करावे, असे ही ते म्हणाले.

 या  अभियानांतर्गत ग्रामस्तरावर सिंगल युज प्लास्टिकचे संकलन व वर्गीकरण, ग्रामपंचायत व सार्वजनिक परिसरातील इमारतीमध्ये श्रमदान मोहीम राबवणे, दि. 11 ऑगस्ट रोजी गावातील भिंतींवर स्वच्छता संदेश रंगविणे, दि. 12 ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचे उपक्रम राबविणे, दि. 13 ऑगस्ट रोजी गंदगीमुक्त माझे गाव या विषयावर ऑनलाईन चित्रकला स्पर्धा (इयत्ता 6 वी ते 8 वी ) तसेच याच विषयावर निबंध स्पर्धा (इ. 9 वी  ते 12 वी ), दि. 14 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, दि. 15 ऑगस्ट रोजी ओडीएफ प्लस कार्यक्रमाची घोषणा करणे हे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच टोल क्रमांक 1800800404 यावर स्वच्छताग्रही व नागरिकांनी प्रतिसाद नोंदवावा तसेच ग्राम पंचायत स्तरावर दि. 15 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांना कोविड  19 च्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून स्वच्छतेची शपथ व इतर उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन