अलिबाग :

कोरोना महामारीत रोह्यातील सुदर्शन कंपनीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.कोरोनाची लागण झालेल्या कंपनीतील कर्मचार्‍यांना  पुण्यातील अत्याधुनिक सेवा असलेल्या खासगी रुग्णालयात उपचार करत आहे.

कंपनीत कामगार, कुटुंबीय, परप्रांतीय मजूर, तसेच महाड, रोहा, श्रीवर्धन आणि पुण्यातील पाच हजारांहून अधिक कुटुंबाना एक महिन्याचे धान्य, जीवनावश्यक वस्तूसंच पुरविण्यात आले. रोजंदारीवर असलेल्या परराज्यातील कामगारांना अन्न व दैनंदिन जीवनावश्यक वस्तू देण्यावर भर दिला आहे. कामगारांना मास्क, सॅनिटायझर आणि कॅन्टीनची सुविधा उपलब्ध केली आहे. शिवाय, 106 स्थलांतरित मजुरांना निवारा-जेवण उपलब्ध केले आहे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्या पशुपालनासाठी सहाय्य दिले आहे.

  आरोग्य सुविधांचे बळकटीकरण आरोग्यसेवेतील मूलभूत सुविधांना बळकट करण्यासाठी सरकारला 10 व्हेेंटिलेटर्स, स्थानिक पातळीवर सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, सिरिंज पंप आणि ब्लड मॉनिटरिंग सिस्टिम व इतर वैद्यकीय उपकरणे, औषधे उपलब्ध करून दिली आहेत. बचतगटातील 100 हून अधिक महिलांच्या माध्यमातून    एक लाख कापडी मास्क तयार करून वाटले आहेत. त्यातील तीस हजार आरोग्य विभाग, पोलीस विभाग, आशाताई आणि ग्रामीण आरोग्य केंद्रात वाटप केले.

    उपचाराचा खर्च  सुदर्शन कडे 24 जुनला कंपनीत पहिला रुग्ण आढळल्यानंतर तातडीने रोहा प्लांटचे काम बंद करून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण केले. ङ्गसुदर्शनफशी संबंधित कोरोना रुग्णावर पुण्यातील सिम्बायोसिस रुग्णालयात उपचार होत आहेत. कंपनीच्या प्लांटवरून रुग्ण नेण्यापासून, पुण्यात उपचार व उपचारानंतर घरी सोडण्यापर्यंत सर्व खर्च कंपनी करत आहे. सर्वांवर अतिशय चांगले उपचार होत असून, सुदैवाने आजवर एकही रुग्ण  क्रिटिकल  नाही.  सुदर्श फचे व्यवस्थापन, वरिष्ठ अधिकारी रुग्ण व नातेवाईकांच्या सतत संपर्कात आहेत. शासकीय यंत्रणेला वेळोवेळी माहिती पुरवली जात आहे. आजवर जवळपास 75 रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार होत आहेत.

 कोविड मेडिकल टास्क फोर्स कोरोना संकटापासून बचावासाठी ङ्गसुदर्शनफने पूर्णवेळ ङ्गकोविड मेडिकल टास्क फोर्सफ (सीएमटीएफ) उभारलेय. व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी यांच्या निरीक्षणाखाली हे टास्क फोर्स काम करीत आहे.

संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण कंपनीने आजवर कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य दिलेले आहे. हीच परंपरा लक्षात घेत तातडीने उच्च दर्जाच्या निर्जंतुकीकरण करणार्या संस्थेमार्फत संपूर्ण परिसराचे, कॉलनीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.  

विलगीकरण कक्षाची उभारणी कंपनीच्या परिसरात कामगार व त्यांच्या नातलगांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची उभारणी केली आहे. त्यामध्ये गरजेनुसार वाढ करण्यात येत असून, सर्व आरोग्यसुविधा पुरवल्या जात आहेत. कोरोनाबाबत जनजागृतीसाठी कोविड तज्ज्ञ डॉक्टरांचे इंग्रजी आणि मराठीतून लाईव्ह वेबिनार होताहेत. विलगीकरण कक्षातील, उपचार घेत असलेल्या, तसेच स्थानिक नागरिकांसाठी सकारात्मक मार्गदर्शन सत्रे घेतली जात आहेत.कोरोनाबाबत जनजागृती अभियान, लाईव्ह वेबिनार्स, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन सत्रे सुरु आहेत

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....