Saturday, December 05, 2020 | 11:50 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

सुधागड तालुक्यात १ कोरोना रुग्ण
रायगड
22-Nov-2020 07:10 PM

रायगड

सुधागड-पाली 

सुधागड  तालुक्यात   कोरोनाचा एक रुग्ण सापडला तर एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. तालुक्यात सध्या कोरोनाचे 8 सक्रिय रुग्ण आहेत.  या 8 सक्रिय रुग्णांपैकी 3 रुग्ण वावळोली कोविड केअर सेंटरमध्ये व 1 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला आणि 2 रुग्ण इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 2 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

तालुक्यात आत्ता पर्यंत कोरोनाचे 427 रुग्ण झाले असून 393 रुग्ण बरे झाले आहेत. तर तब्बल 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top