पुगाव 

 पुगाव येथे    दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या  गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी येलकर गुरूजी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचा कमलेश्‍वर मंदिर सभासदातर्फे त्यांना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. दहावीच्या परीक्षेमध्ये ऋतुजा संतोष देवकर हिने रा.ग.पोटफोडे मास्तर या विद्यालयांमध्ये 88.60 टक्के  गुण संपादन करून प्रथम आली असून ती पुगाव येथील रहिवासी आहे. तिला इंजिनिअर व्हायचे आहे.परंतू तिच्या वडिलांची परिस्थिती हालाकिची असल्यामुळे तिचे पुढील शिक्षण पुगाव येथील कमलेश्‍वर मंदिराचे सभासद करणार असल्याचे सर्व उपस्थितां कडून सांगण्यात आले आहे.कमलेश्‍वर मंदीर सभासदांनी भेट वस्तु देऊन  विद्यार्थ्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

अवश्य वाचा