उरण 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरणमध्ये पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून,उरणमध्ये सध्या संचारबंदीसारखे वातावरण आहे.

 जिल्हाधिकारी  मान्यतेने उप विभागीय अधिकारी पनवेल यांनी संपूर्ण उरण तालुका कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.  13  ते  16 जुलै  दरम्यान हा  लॉकडाऊन करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार कालावधी वाढविण्यात येईल तसेच संपूर्ण उरण तालुक्या मध्ये अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती उप विभागीय अधिकारी   दत्तू नवले यांनी दिली आहे.

  उरण चे तहसिलदार यांना दिलेल्या  दिलेल्या  पत्रानुसार या कालावधीत नियमांच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती / संस्था यांचेवर महामारी रोग अधिनियम 1897 आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अंतर्गत इतर संबंधीत कायदे व नियमांच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. त्यानुसार उरण शहरात कडकडीत लॉक डाऊन करण्यात आले असून बाजारपेठ ,भाजी मार्केट ,मच्छी मार्केट , किराणा ,रिक्शा आदी दुकाने बंद ठेवण्यात आली .फक्त मेडिकल दुकाने सुरु होती .दुध  विक्रीसाठी सकाळी 6 ते 8  वाजता पर्यंत दुकाने  खुली ठेवण्यात आली होती .

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली  शहरातील  वैष्णवी हॉटेल जवळ , गणपती चौक .राजपाल नाका ,पालवी हॉस्पिटल ,राघोबा मंदिर ,उरण चारफाटा करंजा रोड  आदी ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे .बंदोबस्तात दहा अधिकारी ,तीस कर्मचारी असा फौजफाटा ठेवण्यात आला आहे . बाजार पेठेत बाईक वर डबल सीट  जाणार्‍या बाईक जप्त करण्यात येणार आहेत . कामा शिवाय विनाकारण  फिर्णार्यांवर  गुन्हा दाखल करण्यात येणार आहे ,नागरिकांनी सहकार्य करावे ,मास्क  लावावे ,सोशल डीस्टन्सिंग  पाळावे  अशी माहिती  उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले.

अवश्य वाचा