मुरुड जंजिरा 

  मुरुड तालुक्यातील साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी शासनाकडून स्टेट हायवेमधून या रस्त्याला 7 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर 1 कोटी 75 लाख रुपये प्राप्त झालेले असून, जर या रस्त्यासाठी पुढील निधी मिळत नसेल तर मला स्पष्ठपणे सांगणे दि. 20 अ‍ॅाक्टोबर रोजी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेवून पुढील निधी आवश्यक अथवा रकमेची कमतरता भासत असेल तर आपणाकडून लेखी म्हणणे द्यावे त्याप्रमाणे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून लागणारा निधी प्राप्त करून घेईन परंतु उर्वरित रस्त्याचे काम तातडीने सुरु करा असे आदेश यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी बांढकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.

सदरचा रस्ता हा बारशीव पर्यंतच येऊन ठेपला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून हे काम बंद आहे.त्यामुळे बारशीव ते आगरदांडा हा रस्ता खड्डेमय झाला असून याचा त्रास ऑटो रिक्षा चालक,विक्रम रिक्षा,दुचाकीस्वारांना या रस्त्यावर तारेची कसरत करावी लागत आहे. पावसाळा थांबला असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खड्डे बुजवण्याचे काम सुद्धा सुरु करण्यात आलेले नाही.त्यामुळे तालुक्यातील जनता त्रस्त झाली असून हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी मागणी होत आहे.

   या प्रकरणाची दखल घेत रायगडच्या खासदार सुनील तटकरे यांनी घेत त्वरित कार्यकारी अभियंता  राहुल  मोरे याना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून सदरचा रस्ता का रखडला आहे.आपले या कामाकडे दुर्लक्ष्य का होत आहे. कार्यकारी अभियंता म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही, काशीद पासून पुढच्या रस्त्याची चाळण झाली असून मोठं मोठे खड्डे झाले आहेत. तातडीने या रस्त्याचे काम सुरु करा असे आदेश ही यावेळी खासदार तटकरे यांनी दिले आहेत. त्यावेळी ते प्रसारमाध्यंशी बोलत होते.