माणगाव

 माणगाव शहरात नवीन बसस्थानक व जुने पंचायत समिती कार्यालय ठिकाणी कोरोनापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी माणगाव नगरपंचायतीने सँनीटायझर फवारा गुरुवार दि.9एप्रीलरोजी  बसविला आहे.नगरपंचायतीने हे जनजागृतीपर कार्य केल्याने तमाम नागरिकांनी नगरीच्या नगराध्यक्षा योगिता चव्हाण,माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव,स्वच्छता व आरोग्य समिती सभापती रत्नाकर उभारे, माजी उपनगराध्यक्ष नीलम मेहता, संदीप खरंगटे,शुभांगी जाधव सर्व विषय समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका,मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्यासह संपूर्ण नगरपंचायतीचे आभार व्यक्त केले आहेत.

 कोरोनाची बाधा ही गर्दीतून लवकरच होत असल्याने गर्दी कमी करण्यासाठी नगरपंचायतीने भाजी व फळांची दुकाने लावण्यासाठी दुकानदारांना माणगाव नवीन बसस्थानक परिसराची जागा व जुने पंचायत समिती कार्यालय परिसराची जागा उपलब्ध करून दिली असून त्याठिकाणी प्रवेशद्वाराजवळ नगरपंचायतीने  9 एप्रिल रोजी सकाळी सँनीटायझरचा फवारा बसविला आहे. सँनीटायझरने विषाणूचा नाश होतो .यासाठी नगरपंचायतीने नागरिकांच्या जीविताची काळजी घेवून हा फवारा बसविला आहे. माणगाव नगरपंचायत व पोलीस प्रशासन कोरोना पार्श्‍वभूमीवर अधिक जागरूकतेने माणगावात काम करीत असल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.  

 

अवश्य वाचा