जेएनपीटी  

 चिरनेर गावातील रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावरील अंधाराचे साम्राज्य दुर करण्यासाठी चिरनेर गावचे सुपुत्र तथा  डॉ प्रविण मोकल यांनी सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत स्व खर्चात रस्त्यावर स्ट्रेट लाईट बसविण्याचे काम हाती घेतल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.    

चिरनेर गावचे नामवंत डॉक्टर डॉ प्रविण वसंत मोकल ह्यांनी आपण ही काही तरी आपली जन्म आणि कर्मभूमी असलेल्या चिरनेर गावासाठी काही तरी करावे हे विचार मनाशी बाळगून त्यांनी ही समाजकार्य करण्याची मनीषा चिरनेर गावचे सामाजीक कार्यकर्ते सचिन घबाडी व गामपंचायत सदस्य किरण कुंभार यांच्याकडे व्यक्त केली असता त्यांनी सध्या चिरनेर गावाला भेडसावत असलेल्या  चिरनेर डीपी ते स्मशानभुमी या रस्त्यात असलेल्या अंधाराच्या साम्राज्यामुळे त्याठिकाणी जनावरांचे वास्तव्य आणि रहदारीसाठी तेथून ये- जा करणार्‍या नागरिकांना होणारा त्रास याबाबतची समस्या समजावून त्या समस्येवर उपाययोजना म्हणून स्ट्रेट लाईट बसवावी असे सुचविले, डॉ.मोकल हयांनी क्षणाचाही विलंब न लावता ते काम सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, परेश पोवळे, सुशांत ठाकुर,दर्शन म्हात्रे, राजेश केणी, अमित मुंबईकर,चंदन कडू, व प्रशांत वशेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतले. 

आज डॉ. प्रविण मोकल यांच्या दातूत्वाच्या कामामुळे अंधारात पडलेल्या रस्त्यावर प्रकाशाची किरणे पडल्याने गावातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करुन डॉ. मोकल यांचे आभार  व्यक्त केले आहेत.

 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचक्रोशीतील आजारी पेशंटचे डॉक्टरां अभावी प्रचंड हाल होत होते त्यासाठी देखील डॉ. मोकल यानी 24 तास सेवा देण्याचे काम हाती.