कोलाड

कर्नाटक येथे रोजगाराची गेलेले पेण पाली येथील लोक आपल्या मूळ गावी  येत असताना ते कोलाड येथे आले असता त्यांची चहा नाष्टाची व्यवस्था येथील संस्था व समाज सेवक यांनी केली आहे.

170 माणसं आपल्या कुटुंबा सहित कर्नाटक मध्ये अडकलेली होती.या अडकलेला पेण व पाली येथील मजुरांना आणण्यासाठी पेण आदिवासी प्रकल्प मार्फत 7 बसेस घेऊन क्रांती पाटील आणि गुरव वावेकर हे कर्मचारी गेले होते.हे बसेस घेऊन परतीच्या प्रवासात दि.29 मे रोजी कोलाड येथे आले असतांना या मजुरांच्या व त्यांच्या कुटुंबाची जीवनधारा संस्थेने नाष्टा ,चहा ,व पाण्याची सोय केली. यावेळी जीवनधारा संस्थेच्या हिल्डा फर्नांडिस, मायाताई, रवी जाधव, सुवर्णा वेदक,ग्रॅसी ताई ,सुरेश वाघमारे,वसंत पवार,तुलसा पवार,अलका वाघमारे ,सुनीता पवार,सुचिता वाघमारे ,उपस्थित होते.

 

अवश्य वाचा