पनवेल 

अंजुमन- ए - इस्लाम या प्रख्यात शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा नुकताच अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी द्वारे ङ्गसर सय्यद एक्सैलेन्स नॅशनल अवॉर्डफ हा वार्षिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. गेल्या 147 वर्षातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान,  तसेच समाजातील सीमांत आणि वंचित घटकांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षण आणि स्त्री सबलीकरणाचा पुरस्कार आदी संस्थेच्या अविरत प्रयत्नांच्या सन्मानार्थ अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीने हा पुरस्कार एका ऑनलाईन सोहळ्यात संस्थेला प्रदान केला.

रु. 1 लाख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व प्रसिद्ध वरिष्ठ रेडियोलोजिस्ट डॉ.झहीर काझी यांनी हा सन्मान मेघालय राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते स्वीकारला.

अंजुमन- ए- इस्लामचे  पनवेल स्थित अब्दुल रज्जाक काळसेकर पॉलिटेक्निक व काळसेकर टेक्निकल कॅम्पसमध्ये पदविका ते पदव्युत्तर तसेच पुढील संशोधनात्मक व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात.  अंजुमन- ए- इस्लाम ला या पूर्वीही अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून सर सय्यद एक्सैलेन्स नॅशनल अवॉर्डबद्दल समाजातील सर्व वर्गातून संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, जनरल सेक्रेटरी श्री.जी. ए.आर. शेख, व पदाधिकारी तसेच मुंबई शिक्षण संस्थांचे एकझ्युकेटीव चेअरमन बुरहान हारिस आणि संस्थाचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त